मी आणि माझे आजोबा
माझे आजोबा म्हणजे डॉ. न. रा. पाठक. ते लोकनेते, सामाजिक कार्यकर्ते व होते. यांची नुकतीच ३० नोव्हेंबर रोजी ३८वी पुण्यतिथी झाली. ३० सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन. मागे मी इंग्रजीमध्ये त्यांच्यावर एक ब्लॉग लिहिला होता https://pathakhospitalmiraj.in/srp/dr-n-r-pathak-the-surgeon/ त्याचे मी मराठी भाषांतर केले, थोडे संपादन केले, थोडा विस्तार केला व काही चित्रे त्यात घातली. त्याची मी एक मराठी पुस्तिका बनवून जवळच्या मित्राना काही महिन्यांपूर्वी पाठवली होती. ती या पोस्ट मध्ये जोडत (embed करत) आहे.
माझे आजोबा म्हणजे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते, पण आज त्यांची आठवण काढली जाते ती मुख्यत्वे त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यासाठी. मी स्वतः एक सर्जन आहे त्यामुळे मला त्यांचे सर्जन म्हणून केलेले कार्य विशेष भावते व असेही जाणवते की त्याची प्रशंसा त्यांच्या इतर योगदानाच्या इतकी होत नाही याची खंत वाटते. वैद्यकीय क्षेत्राशी फार संबंध नसणाऱ्या वाचकास तो परिपेक्ष (पर्स्पेक्टिव्ह) दाखवून द्यावा म्हणून माझा हा प्रयत्न !
ब्लॉग मोठा करून वाचण्यासाठी व्ह्यू फुलस्क्रीन येथे क्लिक करा.

एकाच दमात सर्व लेख वाचला, तुमचे लेखन कौशल्य खुपचं छान असल्यामुळे, माझ्यासमोर संपूर्ण पाठक हॉस्पिटल उभं राहिले. माझे अजूनपर्यंत पाठक सर हेच आदर्श राहिलेत. मला तुमच्या आजोबा प्रमाणेच सरांचे कार्य समांतर वाटते.