माझे आजोबा म्हणजे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते, पण आज त्यांची आठवण काढली जाते ती मुख्यत्वे त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यासाठी. मी स्वतः एक सर्जन आहे त्यामुळे मला त्यांचे सर्जन म्हणून केलेले कार्य विशेष भावते व असेही जाणवते की त्याची प्रशंसा त्यांच्या इतर योगदानाच्या इतकी होत नाही. कदाचित सामान्य जनतेला तो परिपेक्ष (पर्स्पेक्टिव्ह) दाखवून द्यावा म्हणून माझा हा प्रयत्न